कोल्‍हापूर : देवगड-निपाणी रस्त्यावर वेदगंगेचे पाणी; सुमारे फुटभर पाणी, वाहतूक बंद | पुढारी

कोल्‍हापूर : देवगड-निपाणी रस्त्यावर वेदगंगेचे पाणी; सुमारे फुटभर पाणी, वाहतूक बंद

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा भुदरगड तालुक्यासह मुरगुड परिसरात होत असलेल्या संततधार, दमदार मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली आहे. गेले दोन दिवस पाणी पात्राबाहेर पडले होते. पावसाचा जोर कायम राहिल्याने निपाणी-देवगड रस्त्यावर मुरगुड नजिक स्मशान शेडजवळ रस्त्यावर महापुराचे पाणी आले आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे.

वेदगंगा नदीच्या पाणीपत्रात वाढ झाल्याने नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत या बंधाऱ्या वरून होणारे वाहतूक तीन दिवसांपूर्वीच बंद झाली आहे लोक प्रवासी पर्यायी मार्गाचा वापर करून मुरगुड ला ये जा करत होते पण पर्यायी मार्गही बंद झाल्याने आता मुरगुड चा संपर्क तुटला आहे.

सध्या मुरगुड निढोरी दरम्यान असणाऱ्या मुरगुड च्या स्मशान शेड जवळ रस्त्यावर अंदाजे फुटभर पाणी आले आहे. एवढ्या पाण्यातून वाहतूक करणे सहज शक्य होते पण याच ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे रस्ता कॉंक्रिटी करणासाठी एका बाजूला खोदला गेला आहे तर दुसऱ्या एकेरी बाजूनेच या ठिकाणी वाहतूक सुरू होती काँक्रिटी करणासाठी ऐन पावसाळ्यात महापूर सदृश्य कालावधीत रस्ता खोदल्या मुळे प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. असाच पावसाचा जोर कायम राहिला तर या ठिकाणी पाण्याची पातळी वाढू शकते दोन्ही बाजूला टाकलेला भराव पाण्याच्या विसर्ग होण्यास अडचणीचा ठरत आहे. या परिसरात असणाऱ्या बेनिग्रे, करंजीवने, अवचितवाडी ,सोनाळी येथील तलाव क्षेत्रात चांगला पाऊस उतरल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. मुरगुड परिसरात काल दिवसभर पावसाने थोडी वसंत घेतली होती पण संध्याकाळ पासून रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत आहे.

हेही वाचा :  

Back to top button