कोल्हापूर : रणजीत पाटील तुमच्या वक्तव्यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळालं – समरजीतसिंह घाटगे | पुढारी

कोल्हापूर : रणजीत पाटील तुमच्या वक्तव्यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळालं - समरजीतसिंह घाटगे

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : रणजीतसिंह पाटील यांनी माझ्या राजकीय भावी वाटचालीबद्दल जे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आपल्याला दहा हत्तीचे बळ मिळालं आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले. सहकार महर्षी स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंती निमित्त येथील सानिका स्पोर्ट्स फौंडेशन यांच्यावतीने ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील होते. यावेळी मुरगुड प्राथमिक शाळा व मुरगूड विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, रणजीतसिंह पाटील, काहीही वेगळा निर्णय घेत नाही. आपण पक्षातच राहणार आहोत. कागल विधानसभा मतदारसंघात काम करत राहणे , लोकांच्या सेवेत राहुन त्यांचे आशीर्वाद मिळवत राहणार आहोत. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य मिळत राहू दे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हेही वाचलंत का?

 

 

Back to top button