Kolhapur News : गुडे शाळेच्या छताचा गिलावा कोसळून मुख्याध्यापक जखमी

Kolhapur News : गुडे शाळेच्या छताचा गिलावा कोसळून मुख्याध्यापक जखमी
Published on
Updated on

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा: पन्हाळा तालुक्यातील गुडे येथील प्राथमिक शाळेच्या छताचा गिलावा कोसळून मुख्याध्यापक सुभाष पाटील जखमी झाले. ही घटना आज (दि.७) दुपारी २ च्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले. तर सर्व विद्यार्थी सुखरूप (Kolhapur News) आहेत.

या घटनेची माहिती शिक्षकांनी वरिष्ठांना दिली. परंतु ३ ते ४ तास उलटूनही कोणी पाहणी करण्यास आले नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पन्हाळा गट शिक्षणाधिकारी श्रीयुत मानकर यांनी सांगितले की, गुडे येथील प्राथमिक शाळा १८ वर्षापूर्वी बांधण्यात आली आहे. या शाळेच्या इमारतीमध्ये गळती असल्याने ग्रामपंचायतीने छतावर पत्रा मारला होता. मात्र, या छताचा पोपडलेला गिलावा कोसळून मुख्याध्यापक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले (Kolhapur News)  आहे.

प्रशासनाने शाळेच्या इमारतीची देखभाल करण्याची गरज होती. सध्या या शाळेमध्ये वीज नाही. या शाळेत एकूण दोन वर्ग असून एक वर्ग हा पूर्ण मोडकळीस आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी एका वर्गातच बसवले जातात. या शाळेमध्ये एकूण २३ मुले- मुली आहेत. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत अध्यापन केले जाते. शिक्षिका अर्चना गायकवाड व मुख्याध्यापक सुभाष पाटील हे दोघे कार्यरत आहेत. चांगल्या अध्यापनामुळे गुडे परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळेमध्ये घातले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news