कोल्हापूर: कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे जंगी स्वागत

कोल्हापूर: कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे जंगी स्वागत
Published on
Updated on

कागल; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर आज (दि. ७) कार्यकर्त्यांनी जल्लोषी वातावरणात त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.

शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी ग्रामदैवत गहिनीनाथ हजरत गैबी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, गणपतराव फराकते, युवराज पाटील, भैय्या माने, प्रकाश गाडेकर, प्रवीणसिंह पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news