दिपक केसरकर
दिपक केसरकर

कोल्हापूर : आदमापुरात दीपक केसरकर यांनी घेतला बाळूमामाचा आशिर्वाद

Published on

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त आदमापूर ( ता. भुदरगड ) येथील संत बाळूमामा मंदिरास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. त्यांनी बाळूमामांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. स्वागत प्रशासकीय अध्यक्ष शिवराज नाईकवडे यांनी केले.

यावेळी दीपक केसरकर म्हणाले की, सध्या बाळूमामाची ख्याती सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे भक्ताची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पर राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय आहे. भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून जी मदत हवी असेल ती देण्यास शासन वचनबद्ध असल्याचे सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी ग्रामपंचायत सदस्य एस. के. पाटील, व्यवस्थापक अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news