

राशिवडे : प्रवीण ढोणे; राधानगरी तालुक्यातील तुळशी, राधानगरी आणी काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस होत आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये पावसाने उशीरा हजेरी लावली असली तरी त्याच सरासरीच्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर मध्यम प्रमाणात असून धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किंचितशी वाढ झाली आहे. (Kolhapur Rain)
चालूवर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली. जून महिना संपत आलेला असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. पण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी, काळम्मावाडी आणी तुळशी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत आहे. पावसाच्या विलंबामुळे या तिन्ही धरणांनी तळ गाठला होता. पण आता पावसामुळे पाणीसाठ्यात किंचितशी वाढ झाली आहे. ८.३६१ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या राधानगरी धरणामध्ये गतवर्षी २.३५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. हा साठा आजअखेर १.७४ टीएमसी इतका आहे, तर गतवर्षी २६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सध्या ३२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
३.४७१ टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या तुळशी धरणामध्ये गेल्यावर्षी १.३७ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या येथे ०.८२ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर या धरणक्षेत्रामध्ये गेल्यावर्षी ११२ मिमी पावसाची नोंद झाली होती. चालूवर्षी आज अखेर १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तर २५.३९३ टीएमसी.पाणीसाठा क्षमता असणाऱ्या काळम्मावाडी धरणामध्ये गेल्यावर्षी ६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या हा साठा १.३१ टीएमसी इतका आहे. या धरणक्षेत्रामध्ये गेल्यावर्षी २३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. आज अखेर या धरणक्षेत्रामध्ये २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेमध्ये राधानगरी धरणक्षेत्रामध्ये ५५ मिमी तर तुळशी धरणक्षेत्रामध्ये १४ मिमी जादा पावसाची नोंद झाली आहे. तर काळम्मावाडी धरणक्षेत्रामध्ये मात्र २१ मिमी कमी पाऊस झाला आहे. (Kolhapur Rain)
या धरण क्षेत्रामध्ये पावसाने उशीरा का असेना हजेरी लावली आहे. पण यंदा धरणे भरण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :