Kolhapur News : आक्षेपार्ह स्टेटसच्या निषेधार्थ गारगोटीत कडकडीत बंद

Kolhapur News : आक्षेपार्ह स्टेटसच्या निषेधार्थ गारगोटीत कडकडीत बंद
Published on
Updated on

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या निषेधार्थ गारगोटीत पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

औरंगजेबाचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या निषेधार्थ गारगोटी शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी मोटरसाकल रॅली काढून बंदची हाक दिली होती. गुरूवारी सकाळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने, हॉटेल, भाजीपाला व फळ विक्रेते, टपऱ्या, किराणा मालाची दुकाने पुर्णपणे बंद ठेवली.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा क्रांती चौकात एकत्र जमून औरंगजेबाचा स्टेटस लावणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी हुतात्मा क्रांती चौक दणाणून सोडला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संग्राम सावंत यांनी जिल्ह्यातील समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी मराठा संघाचे नंदकुमार शिंदे, संग्राम पोफळे, अरूण शिंदे, प्रकाश पाटील, सागर शिंदे, सतिश जाधव, राजू चिले आदी उपस्थित होते. व्यापारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे उपाध्यक्ष प्रशांत मालंडकर, जितू भाट यांनी पाठींबा दर्शविला. पोलिस निरीक्षक अजय सिंधकर यांनी बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापारपेठ व मशिदीजवळ चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

भुदरगड मुस्लिम समाजाच्या वतीने समाज कंटकांचा निषेध

कोल्हापूर येथील काही मुस्लिम समाज कंटकांनी मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने भुदरगड मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त केला जात असल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.  कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणारा व सर्वधर्म, बंधुता आणि ऐक्य राखणारा जिल्हा आहे, असे पत्रकात म्हटलं आहे. समाज कंटकांकडून घडलेली घटना दुर्दैवी असून संबंधितांवर करडक कारवाई करावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष डी.जी.देसाई, दस्तगीर बागवान, याशील काझी, समीर म्हामरी, शिराजुद्दीन देसाई, आख्तर नाईक, मुबारक शेख, रफिक मुल्ला, सद्दाम बागवान यांनी केली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news