आदमापुरात वादळी वाऱ्यासह पावसामूळे ५० लाखांचे नुकसान | पुढारी

आदमापुरात वादळी वाऱ्यासह पावसामूळे ५० लाखांचे नुकसान

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आदमापूर ता. भुदरगड येथील अनेक शेतकऱ्यांचे सुमारे 50 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक घरावरील कौले,पत्रे, उडून गेले आहेत. शेती व गावाला वीज पुरवठा करणारे बारा खांब जमीन दोस्त झाले आहेत. यामुळे वीज गायब झाली आहे. ग्रामपंचायत आदमापूर या ठिकाणी एक जून रोजी पंचनामा करण्यात आला. वादळी वाऱ्याने व पावसाने झालेले नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.

बाळूमामा मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानात वरील पत्रे व कागद उडून गेले आहेत. मंदिर परिसरात भाविकांना सावलीसाठी बांधलेले मंडप नाहीसे झाले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. सर्जेराव रंगराव पाटील यांच्या घरावर विद्युत खांब पडून घराचे प्रचंड नुकसान झाले. एका बाजूची भिंत पडली आहे. संपूर्ण रूपकाम खराब झाले आहे. गजानन पाटील व जीवन पाटील यांच्या ग्रींहाऊस चे नुकसान झाले आहे. या दोन्ही शेतकऱ्यांची ग्रीन हाऊस जमीन दोस्त झाली आहेत. स्मशान शेड वरील लोखंडी रुकाम व पत्रे उडून गेले आहेत. शंकर गणपती पाटील, शिवाजी खंडू पाटील, राजाराम ज्ञानू पाटील, विष्णू कृष्णा पाटील अशा तीस ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊस पिकात झाडे उनमळून पडले आहेत त्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच पडलेले विजेचे खांब उभा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तलाठी धनाजी पाटील व ग्रामसेवक डीबी माने यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आज पंचनामा पूर्ण केला आहे.

सुदैवाने जीवित हानी नाही…

वादळी वाऱ्याचा वेग इतका तुफान होता की घरावरील पत्रे व रूप कामासाठी वापरलेले लोखंडी अँगल दूरवर उडून गेले होते. मुसळधार पाऊस असल्यामुळे ग्रामस्थ घरातून बाहेर नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीन वर्षांपूर्वी आदमापुर गावापुरताच तुफान गारांचा पाऊस झाला होता यावेळी ऊस पिक जमीन दोस्त झाले होते त्या गारांच्या पावसाची आठवण झाली.

-हेही वाचा 

देशाचे संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी मोदी सरकारला रोखणे गरजेचे : सिताराम येचुरी

सोलापूर जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Back to top button