कोल्हापूर: कासारवाडी येथे वन विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे | पुढारी

कोल्हापूर: कासारवाडी येथे वन विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : येथील शेतातील ऊस, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात गव्यांच्या कळपाकडून नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे वन विभागाच्यावतीने करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून गव्यांचा कळप या परिसरात वावरत आहे. सध्या उन्हाची तीव्रता व जंगलांना लागलेल्या आगीमुळे जंगलात वन्य प्राण्यांना चारा उपलब्ध नसल्याने त्यांनी आपला मोर्चा शेतशिवाराकडे वळवला आहे. यामध्ये नुकत्याच लागण केलेल्या ऊस, मका या पिकांवर गव्यांचा कळप डल्ला मारताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ऊस पिकांची लागण केली आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यातच गव्यामुळे शेतकरी हतबल झाला आहेत. मागील आठवड्यात कासारवाडी येथील गाढव धरा या परिसरात कळपाकडून प्रकाश खोत, उत्तम खोत, अजित खोत यांच्या शेतातील ऊस, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंबंधीची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या वनरक्षक रेणुका नाईक यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार पंचनामे केले.

हेही वाचा 

Back to top button