लाईट बिले वेळेवर येत नसल्यामुळे लाईनमनला घेरा; विज कनेक्शने तोडल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा | पुढारी

लाईट बिले वेळेवर येत नसल्यामुळे लाईनमनला घेरा; विज कनेक्शने तोडल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा

बिद्री : पुढारी वृत्तसेवा : कागल तालुक्यातील बाचणी परिसरातील चार गावात घरगुती लाईट मिटरची रिडींग घेण्याचे व बिले वाटपाचे काम महावितरणचे कंत्राटी कामगार करीत आहेत. पण कांही ग्राहकांचे गेली २ महिने ते वर्षभर लाईट मिटरचे रिंडीग घेतलेली नाहीत. तर काहीना सहा महिने विज बिले मिळाली नाहीत. सुमारे २ हजार ते २५ हजार रुपयांची बिले थकीत आली आहेत. त्यामुळे थकीत बिले वसुली सुरू करण्यात आली असून थकीत बिलासाठी विज कनेक्शनने तोडण्यात येत आहेत. यासाठी बाचणी ग्रामपंचायतजवळ नागरिकांनी महावितरणच्या लाईनमनला घेरा घालून धारेवर धरले.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, बाचणी परिसरातील चार गावात विज महावितरणने कंत्राटी कामगार नेमून घरगुती विज मिटरचे रिडींग व त्यानंतर विजे बिले वाटपाचे काम दिले आहे. पंरतु अनेक ग्राहकांची वेळेत विज मिटर रिडींग व त्याची बिले सुमारे २ महिने ते वर्षभर दिली गेली नाहीत. त्यामुळे ही विज बिले सुमारे २ हजार ते २५ हजारपर्यंत ग्राहकांना आली आहेत. गावात ११०० विज कनेक्शन असून यापैकी ६१९ थकीत ग्राहक आहेत. या सर्वांची सुमारे ७ लाख ५० हजार रूपयांचे थकीत विज बिले आहेत.

दरम्‍यान, सध्या या थकीत बिलाचा तगादा महावितरणने लावला आहे. विज कनेक्शन तोडली जात असताना वीज ग्राहक खडबडून जागे झाले आहेत. विजे बिले मिळाली नाही तर भरणार कोठून? असा प्रश्न विचारत दिगंबर चांदेकर व अन्य कर्मचाऱ्यांना घेरा घालत धारेवर धरले. जोपर्यंत विजेचे अचुक रिडींग घेवून बिले वेळेवर मिळत नाहीत. तसेच महावितरणच्या चुकीमुळे आकारेला दंड व व्याज माफ होत नाही तोपर्यंत बिले न भरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ग्रामपंचायतीने याबाबतचे निवेदन महावितरणला अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता परीक्षित उदगावे यांनी वीज बिले मिळाली नाहीत. याची चौकशी करीत असून विज कनेक्शन न तोडण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. वरिष्ठांशी बोलून योग्य तोडगा काढत आहे. असे असे भ्रमणध्वनीवरून यावेळी आंदोलकांना सांगितले.

पूर्वी तीन महिन्यातून एकदा विजबिले येत होती. आता महिन्याला विज बिले येत आहेत. पहिले विजबिल भरण्याची तारीख संपते तोपर्यंत दुसरे बिल आल्याचे दिसते. विजेचे वाढलेले दर त्याचबरोबर बिल न भरल्यास बिलापोटी दंड व व्याज यामुळे सर्व सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. कर्मचार्‍यांच्या चुकीमुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड बसत आहे. महावितरणने याची शिस्त लावून दंड, व्याज माफ न केल्यास तसेच विज कनेक्शनने तोडल्यास तिव्र आंदोलन उभारणार आहोत.

-हेही वाचा 

छत्रपती संभाजीनगर- पुणे शिवाई ई-बसला सुरूवात

Jallikattu Supreme Court Judgement | सांस्कृतिक वारसा न्यायव्यवस्थेचा भाग असू नये, SC कडून तामिळनाडूतील ‘जल्लीकट्टू’ची वैधता कायम

चंद्राचा ‘द व्हिन्सी ग्लो’ बघा चालू आठवड्यातच! .. 15 व्या शतकात उलगडले घटनेचे रहस्य

Back to top button