कोल्हापूर: आजरा तालुका खरेदी-विक्री संघात सत्ताधार्‍यांची बाजी, सर्व १९ जागांवर विजय | पुढारी

कोल्हापूर: आजरा तालुका खरेदी-विक्री संघात सत्ताधार्‍यांची बाजी, सर्व १९ जागांवर विजय

आजरा:  पुढारी वृत्तसेवा :  आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने बाजी मारत सर्व १९ जागांवर विजय मिळविला. अशोक चराटी व जयवंत शिंपी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला.

तालुका संघाच्या १९ जागांसाठी ४ अपक्षासह ४२ उमेदवार रिंगणात होते. शनिवार (दि. १३) रोजी चुरशीने ७६.०३ टक्के मतदान झाले. रविवार (दि. १४) रोजी सकाळी आठ पासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आजरा येथे २१ टेबलावर मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी नऊ वाजता अ वर्ग विकास सेवा संस्था गटातील ७ जागा व ब वर्ग इतर संस्था गटाच्या एका जागेचा निकाल जाहीर झाला. या दोनही गटात सत्ताधारी आघाडीचे ८ उमेदवार विजयी झाले.

त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास व्यक्ती व राखीव गटांचे कल हाती आले. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे कळताच सत्ताधारी आघाडीचे नेते व कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सर्वच निकाल हाती आले. यामध्ये सत्ताधारी आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले. यामुळे सत्ताधारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच आजरा पंचायत समिती ते रवळनाथ मंदिर अशी विजयी मिरवणूक काढली.

विजयी उमेदवार – अ वर्ग विकास सेवा संस्था गट – विठ्ठलराव देसाई, सुनिल देसाई, दौलती पाटील, महादेव पाटील, राजाराम पाटील, महादेव हेब्बाळकर, अल्बर्ट डिसोझा.

ब वर्ग इतर संस्था गट –  उदयराज पोवार.

व्यक्ती सभासद गट – सुधीर देसाई, मधुकर देसाई, मधुकर येलगार, गणपती सांगले, ज्ञानदेव पोवार, रविंद्र होडगे.

महिला गट – राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील.

इतर मागास – संभाजी तांबेकर.

भटक्या विमुक्त जाती-जमाती – महेश पाटील.

अनुसचित जाती-जमाती – गणपती कांबळे.

हेही वाचा 

Back to top button