कोल्हापूर : शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत संस्था गटात सत्ताधारी आघाडीचा सात जागांवर विजय | पुढारी

कोल्हापूर : शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत संस्था गटात सत्ताधारी आघाडीचा सात जागांवर विजय

आजरा; पुढारी वृत्तसेवा : आजरा तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ वर्ग सेवा संस्था गटातून सत्ताधारी आघाडीच्या सर्व सात जागा विजयी झाल्या आहेत. ब वर्ग इतर संस्था गटातूनही सत्ताधारीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

तालुका संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १९ जागांसाठी सत्ताधारी रवळनाथ शेतकरी विकास आघाडी व रवळनाथ परिवर्तन शेतकरी विकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. अ वर्ग सेवा संस्था गटातून सत्ताधारी गटाचे अल्बर्ट डिसोजा, विठ्ठलराव देसाई, सुनिल देसाई, दौलती पाटील, महादेव पाटील, राजाराम पाटील, महादेव हेब्बाळकर तर ब वर्ग इतर संस्था गटातून सत्ताधारी गटाचे उदयराज पोवार विजयी झाले आहेत. व्यक्ती गट व राखीव गटातील मतमोजणी सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे निकाल अपेक्षित आहे. सुरुवातीच्या आठ जागांचे निकाल सत्ताधारीच्या बाजूने लागल्यामुळे सत्ताधारी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

हे ही वाचा :

 

 

 

Back to top button