कोल्हापूर : बानगे येथील मेंढपाळाचा अज्ञातांकडून दगडाने ठेचून खून | पुढारी

कोल्हापूर : बानगे येथील मेंढपाळाचा अज्ञातांकडून दगडाने ठेचून खून

बानगे; पुढारी वृत्तसेवा :  बानगे (ता कागल येथील मेंढपाळ मारुती मायाप्पा करमरे (वय 28) या मेंढपाळाचा अज्ञातांकडून दगडाने ठेचून खून करण्यात आला. शनिवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

आनंदा मेथे यांच्या भटकी नावाच्या शेतात मारुती करमरे यांनी बकर्‍यांचा तळ बसवला होता. हा खून शुक्रवारी रात्री झाला असावा, असे घटनास्थळावर ग्रामस्थ बोलत होते मारुती करमरे यांचे चुलत बंधू सिद्धू रामा धनगर यांना मारुती यांचा मृतदेह विद्रुप अवस्थेत दिसून आला. कागल पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून याची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Back to top button