कोल्हापूर: मुदाळ येथील सुतगिरणीच्या निवडणुकीसाठी ३१ अर्ज दाखल | पुढारी

कोल्हापूर: मुदाळ येथील सुतगिरणीच्या निवडणुकीसाठी ३१ अर्ज दाखल

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या मुदाळ (ता. भुदरगड) येथील हुतात्मा स्वामी वारके सहकारी सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. कापूस उत्पादक गटातून 11, बिगर कापूस उत्पादक गटातून 5 व इतर राखीव गटातून 5 अशा एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. एकूण 21 जागांसाठी 31 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघार घेण्याचा 23 मे हा शेवटचा दिवस असून 31 मेरोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर मतमोजणी 1 जूनरोजी होणार आहे.

हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. सूतगिरणीचे संस्थापक के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत.

यामध्ये ए. वाय. पाटील, पंडितराव केणे, मनोज फराकटे, सुरेशराव सूर्यवंशी, तात्यासाहेब जाधव, उमेश भोईटे, धोंडीराम वारके, आर. व्ही. देसाई, निवासराव देसाई, शिवानंद तेली, गणपतराव डाकरे, सुरेशराव सूर्यवंशी, पंढरी पाटील, जगदीश पाटील, चंद्रकांत कोटकर, दत्तात्रय पाटील, बापूसो आरडे, विठ्ठलराव कांबळे, काका देसाई, रूपालीताई पाटील, सुजाता पाटील, मंगल आरडे, विकास पाटील, किरण पिसे यांचा समावेश आहे. एकूण 8336 सभासद संख्या असणाऱ्या या संस्थेकडे ब गटात 313 मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून युसुफ शेख राधानगरी हे काम पाहात आहेत.

हेही वाचा 

Back to top button