कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
Published on
Updated on

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत सत्तांतर घडवून आणले. काँग्रेसच्या या विजयाचा कुरुंदवाड शहरात फटाक्याची आतषबाजी करून आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज (दि. १३) दुपारी अडीच वाजता काँग्रेस समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटले. तसेच जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

यावेळी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, सुरेश कांबळे, राजमहंमद बागवान, शहराध्यक्ष विजय पाटील, रामभाऊ मोहिते, अजहर तहसीलदार, कुदरत भुसारी, सचिन मोहिते, गजानन कोळी, अखिल गोलंदाज यांच्यासह कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news