इचलकरंजी : गॅस पाईपलाईन योजनेच्या व्हॉल्वला लागली मोठी आग; दुचाकी जळून खाक | पुढारी

इचलकरंजी : गॅस पाईपलाईन योजनेच्या व्हॉल्वला लागली मोठी आग; दुचाकी जळून खाक

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : शहरात नॅचरल गॅस पाईपलाईन योजनेच्या व्हॉल्व मधून गॅस गळती होऊन मोठी आग लागली. सुमारे वीस ते पंचवीस फूट उंच आगीचे लोट पसरले होते. यामध्ये एक दुचाकी अक्षरशः जळून खात झाली आहे. ही घटना शनिवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास पंचवटी टाकी परिसरात लायकर घरासमोर घडली.

इचलकरंजी येथे अचानक लागलेल्या या आगीमुळे नागरिकांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अचानक लागलेल्या आगीमुळे या भागातील विद्युत पुरवठा ही खंडित करण्यात आला होता. आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुमारे अर्धा तास बंद होती.

अधिक वाचा :

Back to top button