राजाराम कारखाना निकाल Live Update : संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी | पुढारी

राजाराम कारखाना निकाल Live Update : संस्था गटातून महादेवराव महाडिक विजयी

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर १३ हजार ५३८ पैकी १२ हजार ३३६ (९१.१२ टक्के) मतदान झाले होते. आज मतमोजणी होत असून या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोल्हापूर, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

Live Update :

दुसऱ्या फेरीतही सत्ताधारी महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान, कसबा बावडा परिसरात विरोधी गटाला ६६ टक्के, तर महाडिक गटाला ३४ टक्के मते पडली आहेत. इतर ठिकाणी महाडिक गटाची सरशी दिसून येत आहे.

पहिल्या फेरीअखेर सर्व गटात महाडिक गट आघाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीत विरोधी सतेज पाटील गट मताधिक्य कमी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • महिला राखीव प्रतिनिधी (पहिली फेरी) :

महाडिक गट-

कल्पना पाटील (टोप, ता. हातकणंगले) – 3255
वैष्णवी नाईक (कांडगाव, ता करवीर) – 3195

आमदार सतेज पाटील गट :

निर्मला पाटील (निगवे दुमाला, ता. करवीर) – 2493
पुतळाबाई मगदूम (कांडगाव, ता. करवीर) – 2345

  • इतर मागासवर्गीय प्रतिनिधी :

सत्ताधारी महाडिक गट :
संतोष पाटील (यवलूज, ता. पन्हाळा) – 3219

आमदार सतेज पाटील गट :
मानसिंग खोत (नरंदे, ता. हातकणंगले) – 2456

  • भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी

सत्ताधारी महाडिक गट :
सुरेश तानगे (कुभोज, ता. हातकणंगले) – 3265
आमदार सतेज पाटील गट :
आण्णा रामण्णा (पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) – 2419

  • अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी

सत्ताधारी महाडिक गट :
नंदकुमार भोपळे (चोकाक, ता, हातकणंगले) – 3193
आमदार सतेज पाटील गट :
बाबासो देशमुख (शिरोली पु., ता. हातकणंगले) – 2371

  • व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक 6 (पहिली फेरी) –
    व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक पाच मध्ये पहिल्या फेरीत सत्ताधारी महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर

सत्ताधारी महाडिक गट :
गोविंद चौगले (सोन्याची शिरोली) – 3246
डॉ. विश्वास बिडकर (धामोड) – 3163

आमदार सतेज पाटील गट :
दगडू चौगले (धामोड, ता. राधानगरी) – 2413
शांताराम पाटील (सावर्धन, ता.राधानगरी) – 2398

  • संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. संस्था गटात १२९ पैकी १२८ मतदारांनी मतदान केले होते. त्यातील महाडिक यांना ८३ इतकी मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पाटील (वसगडे, ता करवीर) यांना ४४ इतकी मते मिळाली आहेत.
  • व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक 5 (पहिली फेरी) –

व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक पाच मध्ये पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाचे दिलीप उलपे आणि नारायण चव्हाण आघाडीवर

सत्ताधारी महाडिक गट :
दिलीप यशवंत उलपे (कसबा बावडा) – 3200
नारायण बाळकृष्ण चव्हाण (कसबा बावडा) – 3130

आमदार सतेज पाटील गट :
विजयमाला विश्वास नेजदार (कसबा बावडा) – 2375
मोहन रामचंद्र सालपे (कसबा बावडा) – 2302

  • व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक 4 (पहिली फेरी) –
    व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक चार मध्ये पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

सत्ताधारी महाडिक गट :
तानाजी कृष्णात पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर) – 3148
दिलीपराव भगवान पाटील (शिरोली पु., ता. हातकणंगले) – 3217
मिनाक्षी भास्कर पाटील (वाशी, ता. करवीर) – 3144

आमदार सतेज पाटील गट :
दिनकर भिवा पाटील (वाशी, ता. करवीर) – 2176
सुरेश भिवा पाटील (वाशी, ता. करवीर) – 2395
संभाजी शंकर पाटील (वाशी, ता. करवीर) – 2333

  • व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक 3 (पहिली फेरी) –
    व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक तीन मध्येही पहिल्या फेरीअखेर सत्ताधारी गटाचे उमेदवार ८०० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे दुसऱ्या फेरीत विरोधी आघाडी मताधिक्य कमी करणार का याकडे लक्ष लागले आहे.

सत्ताधारी महाडिक गट :
डॉ. मारूती भाऊसो किडगांवकर (निगवे दु. ता. करवीर) – 3129
विलास यशवंत जाधव (शिये, ता. करवीर) – 2934
कृष्णा सर्जेराव पाटील (वडणगे, ता करवीर) – 3051

आमदार सतेज पाटील गट :
बळवंत रामचंद्र गायकवाड (आळवे, ता. पन्हाळा) – 2158
विलास शंकर पाटील (भुये, ता. करवीर) – 2068
विठ्ठल हिंदुराव माने (वडणगे, ता. करवीर) – 2361

  • व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक २ (पहिली फेरी) –
    व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक दोनमध्ये पहिल्या फेरीत सत्ताधारी गटाचे उमेदवार ८०० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

सत्ताधारी महाडिक गट :
शिवाजी रामा पाटील (लाटवडे, ता. हातकणंगले) – 3198
सर्जेराव बाबुराव भंडारे (नरंदे, ता. हातकणंगले) – 3173
अमल महादेवराव महाडिक – 3358

आमदार सतेज पाटील गट :
शिवाजी ज्ञानू किबिले (कुंबोज. ता. हातकणंगले) – 2261
दिलीप गणपतराव पाटील (टोप, ता. हातकणंगले) – 2328
अभिजीत सर्जेराव माने (भेंडवडे, ता. हातकणंगले) – 2184

  • व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक १ (पहिली फेरी) –
    पहिल्या फेरीत व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक एकमध्ये सत्ताधारी गटाचे उमेदवार ७०० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

सत्ताधारी महाडिक गट :
भोसले विजय वसंत (रूकडी, ता. हातकणंगले) – 3244
मगदूम संजय बाळगोंडा (रूई, ता. हातकणंगले) – 3169

आमदार सतेज पाटील गट :
बेनाडे शालन बाबुराव (रुई, ता. हातकणंगले) – 2441
भोसले किरण बाबासो(रूकडी, ता. हातकणंगले) – 2413

  • ९.४० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
  • सत्तारूढ आणि विरोधी आघाडीचे उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतमोजणी केंद्रावर हजर आहेत.
  • मतपत्रिका वेगळ्या करण्याचे काम सुरू आहे. सकाळी साडे नऊ वाजल्यानंतर प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होईल.
  • निवडणूक अधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतपेट्या फोडून मत पत्रिकांची गट निहाय वर्गवारी करत ५० चे गठ्ठे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • सकाळी ७.५५ वाजता मतपेट्या स्ट्रॉंगरूम मधून बाहेर काढण्यास सुरुवात झाली.

अशी होणार मतमोजणी

29 टेबलवर दोन फेर्‍यांमध्ये मतमोजणी होत आहे. पहिली फेरी सकाळी आठ ते दुपारी एक, तर दुसरी फेरी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या दरम्यान होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 29 मतदान केंद्रातील तर दुसर्‍या फेरीत 30 ते 58 मतदान केंद्रातील मतमोजणी होईल.

चोख पोलिस बंदोबस्त

मतदानापूर्वी झालेले टोकाचे आरोप-प्रत्यारोप आणि अटीतटीने झालेले मतदान यामुळे मतमोजणी वेळी खबरदारीचा उपाय म्हणून सत्तारूढ आघाडीच्या समर्थकांना ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्क जवळ धोबी घाट येथे तर विरोधी परिवर्तन आघाडीच्या समर्थकांना नियोजित शंभर फुटी रिंगरोडवर थांबण्यास पोलिसांकडून सुचना देण्यात आली आहे. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली असून चोख बंदोबस्त ठेवला आहे.

वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार ?

छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.२३ रोजी मतदान झाले. ७ तालुक्यातील ५८ मतदान केंद्रांवर ९१.१२ टक्के चुरशीने व अटीतटीने मतदान झाले. संस्था गटात १२९ पैकी १२८ मतदारांनी मतदान केले. तर १३ हजार ५३८ पैकी १२ हजार ३३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गत निवडणुकीच्या तुलनेत एका टक्क्याने वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button