कुरुंदवाड व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी | पुढारी

कुरुंदवाड व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा कुरुंदवाड शहर व परिसरात रमजान ईद उत्साही वातावरणात संपन्न झाली. ईदगाह मैदानावर मौलवी अरबाज मुफ्ती यांनी ईद उल फित्रची नमाज पठण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. समस्त बहुजन समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. ईदच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना वृक्षारोपणासाठी समाज प्रमुखांनी आवाहन केले.

दरम्यान आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी इदगाह येथे मुस्लिम समाज भवन हॉलसाठी दीड कोटी रुपये मंजूर करून दिल्याने आमदार पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पायाभरणी शुभारंभ करण्यात आला.

कुरुंदवाड शहर मुस्लिम समाजाच्यावतीने काल (शुक्रवार) चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने आज (शनिवार) ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ईद करण्यासाठी मुस्लीम धर्मीयांनी तयारी केली. येथील ईदगाह मैदान येथे आज सकाळी नऊ वाजता नमाज पार पडली. मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मीरासाहेब पाथरवट यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सेक्रेटरी अस्लम जमादार यांनी अहवाल वाचन केले. समाजबांधवांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता. अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करत बहुजन समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
समाज प्रमुख पाथरवट यांनी समाज बांधवांना आपापल्या घराच्या परिसरात, शेतात, रस्त्याला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी वृक्षारोपण करून जतन करावे असा संदेश देत आवाहन केले. सपोनि बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील यांनी शहरात पोलीस बंदोबस्त लावला होता.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, वैभव उगळे, अक्षय आलासे, दीपक गायकवाड, सुरेश बिंदगे, दयानंद मालवेकर यांनी शुभेच्छा दिल्या. अँड राजुभाई बारगीर, मिरअहमद बागवान, इकबाल पटवेगार, सलीम जमादार, अलीखान पठाण, याकूब मुल्ला, अल्लानूर बागवान, बालेचंद अपराध, दस्तगिर फकीर, जहांगीर जमादार, सिकंदर कोठीवाले, इसाक घोरी, अलताफ बागवान, कुदरत भुसारी, टिक्काखान पठाण, लियाकत बागवान, नासिरखान पठाण यांच्यासह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button