Akshaya Tritiya 2023 | अक्षय्यतृतीयेला सोने खरेदी करताय, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

Gold rate today
Gold rate today
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आज अक्षय्यतृतीया असून साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshaya Tritiya 2023) एक शुभमुहूर्त समजल्या जाणाऱ्या या दिवशी सोने खरेदी केली जाते. दरम्यान, देशभरात सोन्याच्या दरात किचिंत घट झाली आहे. शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,१०० रुपयांवर आहे. तर चांदी प्रति किलो ७४,७०० रुपयांवर आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. (Gold Rate Today)

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,१९१ रुपयांवर आहे. २३ कॅरेट सोने ५९,९५० रुपये, २२ कॅरेट ५५,१३५ रुपये, १८ कॅरेट ४५,१४३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३५,२१२ रुपये आहे. तर चांदीचा प्रति किलो ७४,७७३ रुपयांवर आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी धनत्रयोदशीच्या वेळी शुद्ध सोन्याचा दर ५०,६०० रुपयांवर होता. आता हा दर ६०,१९१ रुपयांवर पोहोचला आहे.

सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ आज २२ एप्रिल म्हणजेच सकाळी ०७:४९ वाजल्यापासून सुरू होईल आणि २३ एप्रिलपर्यंत म्हणजेच उद्या सकाळी ०५:४८ वाजेपर्यंत सुरू राहील. सोने खरेदीचा एकूण कालावधी २१ तास ५९ मिनिटे असेल. (Akshaya Tritiya 2023)

अक्षय्यतृतीयेला सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

२२ एप्रिल २०२३- ६०,१९१ रुपये
३ मे २०२२- ५०,८०० रुपये
१४ मे २०२१- ४७,७०० रुपये
२६ एप्रिल २०२०- ४६,५२७ रुपये
७ मे २०१९- ३१,७२९ रुपये
१९ एप्रिल २०१८- ३१,५९८ रुपये
२८ एप्रिल २०१७- २८,८७३ रुपये

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news