Cardamom Cultivation | कोल्हापूर : केरळची हिरवी वेलची पिकवली परसबागेत, गारगोटीतील वर्षा शहांची किमया | पुढारी

Cardamom Cultivation | कोल्हापूर : केरळची हिरवी वेलची पिकवली परसबागेत, गारगोटीतील वर्षा शहांची किमया

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा; केरळची वेलची पिकविण्याची किमया गारगोटीतील उद्योजिका वर्षा शहा यांनी केली आहे. त्यांनी दोन गुंठ्यात पाच हजार रूपयांचे उत्पन्न घेतले आहे. मसाल्याच्या विविध झाडांसोबत दुर्मीळ औषधांची परसबाग फुलविणाऱ्या वर्षा शहा यांची गार्डन महिलांसाठी एक वेगळा आदर्श ठरत आहे. (Cardamom Cultivation)

सासरे श्रीकांत शहा यांनी अकरा वर्षा पुर्वी केरळ सहलीवरून परतत असताना एक वेलचीचे रोप आणले. या रोपाची आज हजारो रोपे वर्षा शहांनी तयार केली असून तब्बल अर्धा गुंठ्यात ही रोपे लावली आहेत. रोपांची वाढ सहा ते सात फुटांपर्यंत झाली आहे. वर्षातून एक वेळा ह्या रोपांच्या मुळाशी वेलची लागते. या रोपांना सेंद्रीय खताचा डोस दिला जात असून वेळच्या वेळी त्यांची देखभाल केली जाते.

सावलीमध्ये ही रोपे चांगली येतात. घराच्या पाठीमागे असलेल्या दोन गुंठ्यात वाढवलेल्या रोपांकडून वेलचीचे दीड किलो उत्पादन मिळते.
वर्षा शहांना झाडांची आवड असून बाहेर कोणतेही फुलझाड पाहिले की ते आपल्या बागेमध्ये दिसले पाहिजे असा त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. त्या आपला बहुतांशी वेळ परस बागेत घालवतात. बागेत काळी मिरी, ओवा, मिक्स मसाला पान, हळद, अल्ले, कडीपत्ता यासारख्या मसाल्याच्या झाडांबरोबर नरक्या, सागवान, रामफळ, केळी, आंबा या फळ झाडाबरोबरच तीन प्रकारची जास्वंद, शेवंती, निशीगंध, गुलाब, कमळ, एक्झोरा, मोगरा, कुंदा विविध जातींची फुले लावून त्यांनी परसबाग व टेरेस बाग फुलविली आहे. घराच्या बाहेरील संरक्षण भिंतीवरही विविध झाडांच्या वेली, फुलझाडे लावून घराची भिंतीवर हिरवाई फुलवली आहे.

नारळीच्या रोपे तयार करण्यात मोठा हातखंडा

आंब्याची रोपे तयार करताना कित्येक झाडांना त्यांनी कलमे बांधली आहे. कलम बांधल्यानंतर त्या झाडांची वाढ करून त्यांनी नाधवडे येथील शेतामध्ये लागण केली आहेत. नारळीच्या रोपे तयार करण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे. या कामात सासरे श्रीकांत शहा व पती संतोष शहा मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Cardamom Cultivation)

 हे ही वाचा :

Back to top button