कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : संरक्षण दलात देशसेवा केल्याने यशाचे सर्व निकष एकाच ठिकाणी पूर्ण होतात. योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास ते अशक्यही नाही, असे प्रतिपादन ले. कर्नल समीर बोरस्कर (निवृत्त) यांनी केले. (NDA Career Opportunities)
दै. 'पुढारी' आणि नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 'नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमधील (NDA) करिअर संधी' या विषयावर मार्गदर्शन सत्रात ते बोलत होते. या उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कमांडर सचिन जोग (निवृत्त) यांनीही मार्गदर्शन केले. (NDA Career Opportunitie)
गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळाचे चेअरमन संदीप नरके, जयश्री नरके, दै. 'पुढारी'चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, सत्यशील नरके, प्राचार्या माहेश्वरी चौगुले, कॅप्टन संजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
तिन्ही संरक्षण दलांत अधिकारी होण्यासाठी उमेदवारांमध्ये विशिष्ट गुण असणे आवश्यक असते. शैक्षणिक गुणवत्तेसोबत संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची तपासणी यूपीएससीमार्फत घेतल्या जाणार्या एनडीए प्रवेश परीक्षेत, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) चाचणीतून होते, असे जोग यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील मुले संरक्षण दलात जवान म्हणून दाखल होतात; पण अधिकारी होण्याचे प्रमाण कमी आहे. ते प्रमाण वाढावे, यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत, असे संदीप नरके यांनी सांगितले. विक्रम रेपे यांनी आभार मानले. कॅडेट सुजल कदम व साक्षी पोवार यांनी सूत्रसंचालन केले.
या उपक्रमाला कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपर्यांतून विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. प्रतिसाद इतका प्रचंड होता की, राजर्षी शाहू स्मारक भवनची जागा अपुरी पडली. दालनाबाहेर स्क्रिन लावून त्यावर या सेमिनारचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले. स्टेजवर आणि खुर्च्यांच्या मध्ये असलेल्या मार्गिकेत उभे राहून अनेक विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला.
मार्गदर्शन करताना ले. कर्नल समीर बोरस्कर (निवृत्त) आणि कमांडर सचिन जोग (निवृत्त)
सेमिनार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा;