कोल्हापूर: तमनाकवाड्यात अतिसाराची लागण; २४ रुग्ण आढळले | पुढारी

कोल्हापूर: तमनाकवाड्यात अतिसाराची लागण; २४ रुग्ण आढळले

माद्याळ: पुढारी वृत्तसेवा : तमनाकवाडा (ता. कागल) येथे सार्वजनिक नळ पाणी योजनेच्या नळामध्ये मिसळलेले गटारीचे पाणी पिल्याने नागरिकांना अतिसाराची लागण झाली. तीन दिवसांत २४ रुग्ण आढळून आले आहेत. तीन दिवसांपासून अतिसाराची लागण सुरु असून आज (दि.२४) आणखी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

अतिसार
कापशी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक गावात ठाण मांडून आहे. दोन रुग्णांवर गडहिंग्लज येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. यावेळी टाकीकडे जाणाऱ्या जलवाहिनीमध्ये गटारीतील पाणी मिसळले. हे दुषित पाणी पिण्याच्या टाकीत मिसळल्याने एका गल्लीतील नागरिकांना बाधा झाली.
गुरूवारी आणि शुक्रवारी ६ अशा आणखी १२ रुग्णांची त्यात भर पडली. २२ रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. कापशी आरोग्य केंद्राचे डॉ. अमितकुमार आदटराव, डॉ. मोनिका धामणकर, एस. आर. पाटील आणि त्यांच्या पथकाने घरोघरी सर्वेक्षण करून मेडिक्लोरचे वाटप केले. खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने टाक्यांची स्वच्छता करून तीन दिवस पाण्याचा पुरवठा बंद केला आहे.

हेही वाचा 

Back to top button