कोल्हापूर : पावनखिंडीतील लोखंडी शिडी बनली धोकादायक | पुढारी

कोल्हापूर : पावनखिंडीतील लोखंडी शिडी बनली धोकादायक

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : ‘पावनखिंड रणसंग्राम’ ज्या खिंडीत घडला, ते ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पावनखिंडीत होत आहे. मात्र खिंडीत उतरण्यासाठी असलेली अरुंद लोखंडी शिडी पर्यटकांसाठी धोकादायक बनली असून ती बदलण्यात यावी, अशी मागणी इतिहासप्रेमी, पर्यटकांतून होत आहे.

पांढरेपाणी ते पावनखिंड (तत्कालीन घोडखिंड) या सुमारे ६ कि.मी. परिसरात अटीतटीची लढाई झाली. यात बांदल-मराठा सैन्यातील रायाजी बांदल, बाजी व फुलाजी प्रभू देशपांडे, संभाजी जाधव, विठोजी काटे असे अनेक ज्ञात-अज्ञात मावळे शिवछत्रपतींच्या रक्षणार्थ कामी आले. या स्फूर्तीदायी इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पर्यटक खिंडीत दाखल होत आहेत. पावनखिंडीचा विकास झाला असला तरी खिंडीत उतरण्यासाठी असणाऱ्या शिडीची दुरावस्था झाली आहे. खिंडीतील थरार अनुभवण्यासाठी पर्यटक खाली उतरत आहेत. मात्र, अरुंद आणि धोकादायक शिडी पाहूनच पर्यटकांना धडकी भरत आहे. लहान मुलेही खाली जात असल्याने शिडीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.

पावनखिंड’ चित्रपटातून मिळतेय प्रेरणा

संबंधित बातम्या

पावनखिंड चित्रपटातून प्रेरणा घेऊन पर्यटक ‘पावनखिंडीत’ दाखल होत आहेत. परिणामी येथे मोठी गर्दी होत आहे. पावनखिंड चित्रपटातील लढाईचे ठिकाण आणि येथील ठिकाण हुबेहूब दिसत असल्याने पर्यटकांना खिंडीत उतरण्यासाठी मोह आवरता येत नाही. मात्र लोखंडी शिडी सडल्याने वावर धोकादायक आहे.

– डॉ. झुंझार माने, अध्यक्ष ,स्वराज्य प्रतिष्ठान, शाहूवाडी

हेही वाचा 

Back to top button