कोल्‍हापूर : ८ लाखांची लाच घेताना जुना राजवाडा पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल जेरबंद | पुढारी

कोल्‍हापूर : ८ लाखांची लाच घेताना जुना राजवाडा पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल जेरबंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात आठ लाख रुपयांची लाच घेताना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि कॉन्स्टेबल रुपेश कुंभार या दोघांना सांगली व कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (शनिवार) मध्यरात्री अडीच वाजता सापळा रचून जेरबंद केले.

जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. एसीबी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे

सांगली येथील तक्रारदारांमध्ये या संदर्भात सांगली येथील एसीबी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. या पडताळणीनंतर पथकाने ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह कॉन्स्टेबल लाच प्रकरणी ताब्यात घेतल्याने कोल्हापूर पोलीस दलावर पुन्हा एकदा बदनामीची नामुष्की ओढवली आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापूर पोलीस दलातील सहा पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई झाली होती.

हे ही वाचा :

Back to top button