कोल्हापूर : गाव बंद ठेवत दत्तवाडकरांची पाणी परिषदेला हजेरी | पुढारी

कोल्हापूर : गाव बंद ठेवत दत्तवाडकरांची पाणी परिषदेला हजेरी

दत्तवाड, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या सुळकुड योजनेला पुन्हा एकदा विरोध करून आंदोलन तीव्र करण्यासाठी दत्तवाडकरांनी एकजूट दाखवली आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सुळकुड बोलवण्यात आलेल्या पाणी परिषदेला दत्तवाडकरांनी गाव बंद ठेऊन हजेरी लावली.

पाणी परिषदेला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, यासाठी ग्रामपंचायतकडून जनजागृती देखील करण्यात आली होती. गावकऱ्यांनाही हा विषय अतिशय गंभीर असून त्यामुळे आपलाही भविष्य अंधकारमय होणार याची जाणीव असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेला आव्हानाला येथील सर्व व्यापारी वर्गांनी पाठिंबा देत गाव बंद ठेवले. पाणी परिषदेला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

सदर पाणी परिषदेला दत्तवाडमधील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यसह, विविध संस्थेचे संचालक मंडळ तसेच शेतकरी व व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक व महिलांनी उपस्थित राहून या योजनेसंदर्भात शासनाचा निषेध केला. योजना रद्द करण्यासंदर्भात शासनास भाग पाडण्यासाठी दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने जो काही निर्णय घेण्यात येईल, त्यासाठी दत्तवाड ग्रामस्थांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

हेही वाचलंत का?

Back to top button