Kolhapur : विद्या मंदिर म्हाकवे शाळेच्या विद्यार्थिनीचे कुस्ती स्पर्धेत यश; जिल्ह्यात प्रथम क्रमांक | पुढारी

Kolhapur : विद्या मंदिर म्हाकवे शाळेच्या विद्यार्थिनीचे कुस्ती स्पर्धेत यश; जिल्ह्यात प्रथम क्रमांक

म्हाकवे; पुढारी वॄतसेवा : म्हाकवे येथील विद्या मंदिर म्हाकवे शाळेची विद्यार्थिनी आसावरी अभिजीत गंगाधरे शालेय कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. काल या स्पर्धा छत्रपती संभाजी क्रीडा संकुल कोल्हापूर येथे पार पडल्या. तीन फेऱ्यांमध्ये तिने शिरोळ चंदगड सोनगे येथील मल्लांना आसमान दाखवले. गतवर्षी तिने कागल तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. अनेक कुस्ती स्पर्धेत तिने यश मिळवले आहे. (Kolhapur)

Kolhapur :लहानपणापासूनच कुस्तीची आवड

माहितीनूसार आसावरी  गंगाधरे हिने  कुस्ती स्पर्धेत पन्नास किलो गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. आसावरीला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. आसावरीला कुस्तीची निगडित कोणतीही पार्श्वभूमी नाही. पहिलीला असल्यापासून आसावरी ही सायकलवरून ऊन-पावसाची तमा न बाळगता बाणगे येथे कुस्तीच्या प्रॅक्टिससाठी जात होती. दररोज न चुकता सरावासाठी ती जायची. तिला मुख्याध्यापक बाजीराव खवरे वस्ताद संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ती दोनवडे येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button