दत्तवाड: पुढारी वृत्तसेवा : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीचे पात्र मागील चार दिवसांपासून कोरडे पडले आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आता फेब्रुवारी महिन्यातच ही स्थिती असून जर इचलकरंजीला आणि इतर पाणी पुरवठा योजनांना दूधगंगेतून पाणी दिल्यास नदी काठावरील गावांची काय परिस्थिती होईल ?, असा सवाल दूधगंगा काठावरील नागरिकांतून उपस्थित होत आहे.
दूधगंगा नदीवर अद्याप कोणत्याही मोठ्या योजना कार्यान्वित नाहीत. तरीही दूधगंगा नदीचे पात्र जानेवारी ते मेपर्यंत दरवर्षी तीन ते चार वेळा भर उन्हाळ्यात कोरडे पडते. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची चांगलीच उणीव निर्माण होते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व इतर वापरासाठी पाण्याची गरज भागवण्याकरिता नागरिकांना विहिरी कुपनलिका, बोरवेल आदींचा आधार घ्यावा लागतो. भर उन्हात नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे दूधगंगा नदीवर कोणत्याही नवीन योजना कार्यान्वित होऊ देऊ नयेत, अशी भूमिका सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व महिला वर्गातून व्यक्त होत आहे.
हेही वाचा