मुरगुड : श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तूशांती सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती | पुढारी

मुरगुड : श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तूशांती सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : मुरगूड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तू शांती सोहळ्याच्या बुधवार (दि.२५) रोजी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. कुमारिका पूजन, पंचकन्या सवाष्ण पूजन, असा सर्व विधी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुहासिनी देवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर मंदिर प्रांगणामध्ये गोमातेचे पूजन करण्यात आले. मंदिरावरच्या कळसावर उभारण्यात येणाऱ्या कलशाचे धार्मिक विधी आणि दूध पंचामृत, मृत्तिका, औषधी जल, मध आदी घागरींच्या मधून कलशाला अभिषेक घालून विधिवत त्याचा अभिषेक संपन्न करून ते मंदिरामध्ये आणण्यात आले. त्यानंतर विविध पीठस्थदेवता आवाहन, स्थापना, (ब्रह्मादिमंडल, रुद्रमंडल, वास्तुमंडल, ग्रहमंडल), जलाधिवास (सर्वौषधिस्नान), पुष्पाधिवास, शैय्याधिवास इत्यादी धार्मिक विधी मोठ्या पवित्र आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाले.

आजच्या दिवशी तुकाराम चौक, शाहीर आण्णाभाऊ साठे नगर, संपूर्ण कापशी रोड, सर्व कॉलनी शाहनगर, आंबेडकर नगर, गुरव कॉलनी, बाळुमामा कॉलनी, जांभूळ खोरा व चिमगांव रोड उर्वरीत मुरगुड शहराच्या या भागातील गारवा मंदिरास मोठ्या उत्साहात आणण्यात आला. यावेळी पाच बैलगाडीच्या मधून हजारो नागरिक गारवा घेऊन मंदिराकडे यानंतर मुरगूड शहरातील परिसरातील हजारो लोकांनी गारव्याच्या या महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारी श्री अंबाबाई मातीच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button