बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात; सोलापूरातील ४ जणांचा मृत्यू | पुढारी

बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात; सोलापूरातील ४ जणांचा मृत्यू

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  तिरुपती बालाजी येथे दर्शन घेऊन पुढे जात असताना बुधवारी (दि.२५) दुपारी तवेरा कार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूरचे चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.

महाराष्ट्रातील सोलापूर येथील ९ जण तिरुमला येथे दर्शन घेऊन कानिपकमकडे जात असताना हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त मृत्यू झालेल्या व्यक्तींची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

हेही वाचंलत का?

Back to top button