कोल्हापूर : मुरगूडच्या अंबाबाई मंदिरासाठी गावाचा गारवा: भाविकांची मोठी गर्दी | पुढारी

कोल्हापूर : मुरगूडच्या अंबाबाई मंदिरासाठी गावाचा गारवा: भाविकांची मोठी गर्दी

मुरगूड; पुढारी वृत्तसेवा : मुरगूडचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या नूतन वास्तुचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा सुरु आहे. पाच दिवसांच्या या सोहळ्यात गावाचा गारवा येत आहे. त्यामुळे मंदिरासमोर भाविकांची आज (दि.२५) गर्दी उसळली होती.

गावातील रहिवासी कुटुबांनी अंबाबाईच्या वास्तुशांतीसाठी गारवा आणला. दिंडी स्वरूपात सर्व प्रभागवार ग्रामस्थ एकत्रितपणे वाजत गाजत गारवा घेऊन आले होते. मंदिरासमोरील मंडपात हा गारवा सोडविल्यानंतर सर्व नागरिकांना तो प्रसाद म्हणून देण्यात आला. या गारवा समारंभात आबालवृद्ध सहभागी झाले होते. विशेषतः महिला भाविकांची मोठी गर्दी होती.

सोहळ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कुमारिका पूजन ‘पंचकन्या (सवाष्णपूजन) गोमाता पूजन’ पीठस्थ देवता’ आवाहन स्थापना’ जलधिवास पुष्पाधिवास शैय्याधिवास हे विधी पार पडले. गुरुवारी (दि.२६) मुख्य देवता हवन, प्रासाद वास्तुशांती, सूत्र वेष्टन वास्तुनिक्षेप प्राणप्रतिष्ठा आदी विधी होणार आहेत. हा विधी समारंभ उमेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस भटजी, पंडीत करीत आहेत.
मंदिराबरोबरच मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत. त्यामुळे मुरगूड शहरात मंगलमय व भक्तिमय उत्साहवर्धक वातावरण आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button