कोल्हापूर : मुरगूडमध्ये अंबाबाई मंदिर कलश मिरवणूक उत्साहात; पारंपरिक वाद्यांचा गजर; हजारो भाविकांची उपस्थिती | पुढारी

कोल्हापूर : मुरगूडमध्ये अंबाबाई मंदिर कलश मिरवणूक उत्साहात; पारंपरिक वाद्यांचा गजर; हजारो भाविकांची उपस्थिती

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : मुरगूड (ता. कागल) येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराच्या प्रासादिक वास्तू शांती, पुनः प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्यास भव्य कलश मिरवणुकीने आज (दि.२४) भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. टाळ, मृदंग, धनगरी ढोल, अशा पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणूक पार पडली.

श्री अंबाबाई मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या कलशाची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशा, टाळ, मृदंग या पारंपरिक वाद्याच्या निनादात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन महिलांसह हजारो भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीला नाका नंबर एक येथून मुरगूडमधील आंतरराष्ट्रीय प्रवचनकार श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठ मार्गे बस स्थानक, तुकाराम चौक येथून अंबाबाई मंदिर येथे कलश आणण्यात आला. मंदिरावर प्रतिष्ठापित करण्यात येणारे 11 कलश ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी आणि पाणी घालून कलशाचे पुजन करण्यात आले.

यानिमित्त शहरामध्ये विविध संस्था, तरुण मंडळांकडून स्वागत कमानी उभारल्या होत्या. सुन्नत मुस्लिम जमात, मुरगुड यांच्या वतीने या मिरवणुकीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराजवळ प्रसादाचे आयोजन केले होते. मिरवणुकीनंतर कलश मंदिरात नेण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी कलशारोहण सोहळा पार पडणार आहे.

Back to top button