कोल्हापूर : संत बाळूमामांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका; मुदाळतिट्टा येथे दोन तास ट्रॅ्फिक जाम | पुढारी

कोल्हापूर : संत बाळूमामांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा फटका; मुदाळतिट्टा येथे दोन तास ट्रॅ्फिक जाम

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : आदमापूर येथे संत बाळूमामांच्या दर्शनासाठी अमावास्यानिमित्त आलेल्या भक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. निपाणी-फोंडा राज्य मार्गाचे सुरू असलेले काम आणि ऊस वाहतूक यामुळे मुदाळतिटृटा येथे आज शनिवारी सुमारे दोन तास वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुदाळतिट्टा हे तीन तालुक्याचे प्रमुख ठिकाण आहे. या ठिकाणाहून राधानगरी-कोकण, निपाणी, भुदरगड तालुक्याला जाणारे मुख्य रस्ते आहेत. दररोज जाणा-या वाहनांची संख्या मोठी असल्याने नेहमीच या ठिकाणी वाहतूकीची कोंडी असते. साखर कारखान्यांची ऊस वाहतूकही येथून होत असते. महत्वाचे म्हणजे दर आमावस्याला आदमापूर येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.

आज (दि.२१) अमावास्या असल्याने सकाळपासूनच येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच निपाणी-फोंडा राज्य मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीच्या कोंडीस हा एक आणखी अडथळा ठरत आहे. आज गारगोटी-कोल्हापूर, निपाणी-राधानगरी मार्गावर तब्बल एक-एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. प्रवाशांना तब्बल दीड ते दोन तास वाहनांमध्ये ताटकळत बसावे लागत आहे. लांबचा प्रवास करुन आलेल्या प्रवासी व भाविकांचे मोठे हाल होत आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.

Back to top button