कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान प्रकरणामागे आंतरराज्य टोळी?, डॉक्टरसह एजंटाला अटक, तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍यांकडे देण्याची मागणी | पुढारी

कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान प्रकरणामागे आंतरराज्य टोळी?, डॉक्टरसह एजंटाला अटक, तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍यांकडे देण्याची मागणी

गारगोटी; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठवणार्‍या दोघांना भुदरगड पोलिसांनी गुुरुवारी अटक केली. डॉ. बाबुराव दत्तू पाटील (वय 52, रा. बामणे) या इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरसह सागर शिवाजी बचाटे (39, रा. सोनाळी, ता. कागल) याचा यामध्ये समावेश आहे. यामागे आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता असून, त्याचा तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकार्‍यांकडे देण्याची मागणी होत आहे.

बेकायदेशीर गर्भलिंग निदानप्रकरणी मडिलगे खुर्द येथील विजय कोळस्कर यास मंगळवारी पकडले. तो कित्येक वर्षे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करत होता. त्याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठविणार्‍या एजंटांची मोठी साखळी असल्याची चर्चा आहे. त्याच्याकडून पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भनिरोधक गोळ्या व चार चाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या गुन्ह्यामध्ये एजंटाची मोठी साखळी व मोठे आंतरराज्य रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोळस्कर याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी पाठविणाऱ्या डाॅ. बाबुराव दत्तू पाटील (रा. बामणे) व सागर शिवाजी बचाटे (रा. सोनाळी, ता. कागल) दोन एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे.

बोगस डॉक्टर विजय कोळसकर हा गेली कित्येक वर्षे बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा गोरख धंदा करत होता. त्याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणसाठी पाठविणाऱ्या एजंटांची मोठी साखळी असून आंतरराज्य रॅकेटचाही यामध्ये समावेश असल्याची शक्यता वर्तवली जात असून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून करावा अशी मागणी होत आहे.

 हे ही वाचा :

Back to top button