कोल्हापूर : थरारक पाठलाग करून २१ लाखांचा गुटखा पकडला

कोल्हापूर : थरारक पाठलाग करून २१ लाखांचा गुटखा पकडला
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा तस्करी (Gutkha smuggling) करणाऱ्या वाहनाचा गांधीनगर पोलिसांनी रविवारी (दि.२६) सकाळी महामार्गावर थरारक पाठलाग केला. उचगाव तालुका करवीरजवळ वाहन पकडून २१ लाख रुपये किमतीचा गुटखासाठा हस्तगत करण्यात आला. गुटखा तस्करीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

जमीर अरुण पटेल (वय 45, रा. मलकापूर,जि. सातारा) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. कर्नाटकातून गुटखा व अमली पदार्थाची (Gutkha smuggling) मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची चर्चा होती.

कर्नाटकातील संकेश्वर, निपाणी परिसरातून पुणे बंगळूर मार्गावरून पान मसाला व गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सत्यराज घुले यांना मिळाली.

या माहितीनूसार आज सकाळी पुणे- बंगळूर मार्गावर सापळा रचण्यात आला होता. दरम्यान, वाहनाचा पाटलाग करत उचगावजवळ या वाहनास अडवण्यात आले. वाहनामध्ये २१ लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.

पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

या कारवाईमध्ये आकाश पाटील, मोहन गवळी आयुब शेख, दिगंबर सुतार, आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news