

रेंदाळ, (कोल्हापूर),पुढारी वृत्तसेवा : रांगोळी येथे हुपरी-इचलकरंजी मुख्य मार्गावरील माळभागावर मायकल कॉर्नर म्हणून ओळख असणाऱ्या वळणार दोन मोटारसायकलची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये एका मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. विनायक प्रकाश परीट (वय 22,रा. रामनगर, रेंदाळ) असे त्याचे नाव आहे. अपघातात दुसरा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची नोंद शिवाजी नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विनायक हा इचलकरंजी येथे मित्राला भेटण्यासाठी रेंदाळ येथील आपल्या मित्राची मोटारसायकल (क्र.एम.एच.09-बी.डब्ल्यू.0277) घेऊन जात होता. मायकल कॉर्नवर समोरून येणारी मोटारसायकल (क्र. MH 09.DG.2437) आणि विनायकच्या मोटारसायकलची समोरा-समोर धडक झाली. विनायक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मोटारसायकलस्वार सिद्धगोंडा पाटील (रा. रंगोळी) हा गंभीर जखमी झाला आहे.
विनायक हा मूळचा (रा. ढोणेवाडी,ता.चिक्कोडी) येथील रहिवासी असून गेली 15 वर्षांपासून लॉंड्री व्यवसायाच्या निमित्ताने तो रेंदाळ येथे आपल्या आई वडिलांसोबत वास्तव्यास होता. तो व्यवसाय सांभाळत सैन्य भरतीसाठी प्रयत्न करीत होता. एकुलता एक मुलगा हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :