पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून सातार्याच्या दिशेने जाणार्या एका ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामुळे दोन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळे एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. त्यामुळे दोन्ही ट्रकला भीषण आग लागली आहे. परिणामी, पुण्याहून दक्षिण भागात सातारा-कोल्हापूरच्या दिशेने जाणारी थांबविण्यात आली आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी 1 च्या सुमारास पुण्याहून सातार्याच्या दिशेने निघालेल्या एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक समोरून जात असलेल्या एका ट्रकला धडकला. त्यावेळी एका ट्रकची डिझेल टाकी फुटली. अन आगीचा भडका उडाला. यात दोन्ही ट्रक जळून खाक झाले असून, सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
खंबाटकी घाटातील दत्त मंदिरासमोर ट्रक नंबर जी.जे 27 एक्स 6199 या या ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. त्यामुळे पुण्याहून सातार्याच्या दिशेने जाणारा वाहतूक थांबविण्यात आली असून, या महामार्गावरील वाहतूक बोगदा मार्गे वळविण्यात आली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.