अंंबाबाई मंदिरातील कर्मचार्‍यांनाच मास्कची सक्ती, भाविकांना नाही | पुढारी

अंंबाबाई मंदिरातील कर्मचार्‍यांनाच मास्कची सक्ती, भाविकांना नाही

कोल्हापूर : कोरोनाबाबत केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार देवस्थान समितीतर्फे अंबाबाई मंदिरातील कर्मचार्‍यांना मास्क सक्ती केली आहे. शुक्रवार, दि. 23 पासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

कोरोनाबाबत राज्य शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीची उपाय-योजना म्हणून निर्णय घेतला आहे. यानुसार मंदिर परिसरात सक्रिय असणार्‍या देवस्थान समितीच्या सर्व पदाधिकारी व कर्मचार्‍यांना मास्कची सक्ती असणार आहे; मात्र भाविकांना मास्कची सक्ती नाही. दररोज 10 ते 15 हजार भाविकांच्या संपर्कात देवस्थानचे कर्मचारी येत असतात. यामुळे त्यांच्या स्वसंरक्षणासाठी मास्क सक्ती करण्यात आल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले.

Back to top button