कोल्हापूर : बनाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सासूचा पराभव करून सून झाली सरपंच | पुढारी

कोल्हापूर : बनाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सासूचा पराभव करून सून झाली सरपंच

राशिवडे; पुढारी वृतसेवा : ‘चार दिवस सासूचे, चार दिवस सूनेचे, अशी एक म्हण प्रचलित आहे. राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत या म्हणीचा प्रत्यय आला. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सासूपेक्षा सून वरचढ ठरली. सून प्राजक्ता जयवंत पताडे या चुलत सासू अर्चना आप्पासाहेब पताडे यांचा पराभव करत सरपंचपदी विराजमान झाल्या.

राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी हे शहरालगत असलेले छोटं गाव आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी दतक घेतलेल्या या गावामध्ये कोट्यावधीची विकासकामे सुरु आहेत. येथील प्राथमिक शाळा तालुक्यातील इतर शाळांना आदर्श देणारी आहे. येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर होताच प्रत्येकजण तयारी करु लागला.

छत्रपती घराण्याला आदर्श मानून काम करणाऱ्या विद्यमान  सरपंच आणि सदस्य पुन्हा रिंगणात उतरले. सरपंचपदासाठी प्राजक्ता पताडे व चूलत सासू अर्चना आप्पासाहेब पताडे रिंगणात उतरल्या. या लढतीमध्ये शेवटी सासूपेक्षा सूनच वरचढ ठरली. १३५ मतांनी सासू अर्चना यांचा पराभव करत प्राजक्ता यांनी सरपंचपदाची खुर्ची मिळवली.

हेही वाचा :

Back to top button