कोल्‍हापूर : भुये ग्रामपंचायतीत सत्तांतर, लोकनियुक्त सरपंचपदी मालिनी पाटील-भुयेकर | पुढारी

कोल्‍हापूर : भुये ग्रामपंचायतीत सत्तांतर, लोकनियुक्त सरपंचपदी मालिनी पाटील-भुयेकर

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : भुये (ता.करवीर ) येथील ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह पाच जागेवर विजय मिळवला. तर सत्ताधारी आघाडीला चार जागांवर समाधान मानावे लागले.

भुये ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी उपसरपंच भारत पाटील- भुयेकर, प्रदिप पाटील-भुयेकर ,माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विक्रम पाटील यांनी श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातुन लोकनियुक्त सरपंच पदासाठी पंचायत समिती सदस्या मालिनी पाटील- भुयेकर यांच्या सह नवीन चेहऱ्यांना संधी देत माजी जि.प.सदस्य अमर नाईक,माजी सरपंच अभिजीत पाटील यांच्या सत्ताधारी आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले होते.

अटीतटीच्या लढतीत मालिनी पाटील – भुयेकर यांनी सविता पाटील यांचा ४७ मतांनी पराभव करून सरपंच पदावर नाव कोरले. तर पाच सदस्य निवडून आल्याने सत्तांतर झाले.

श्री हनुमान ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते:

मेघा शिंदे(३३८), संगिता पाटील (३४२),आश्लेश खाडे (३५२), कुलदीप पाटील (३४४), साक्षी पाटील (३४३) विरोधी राजर्षी

शाहू ग्रामविकास आघाडी :

अभिजीत बाबासाहेब पाटील (३३६), कृष्णात चौगले (३७१), विमल पाटील,(३७८), प्रेमला शिंदे (३७८)

.हेही वाचा  

कोल्हापूर : भुदरगडमध्ये ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा

नगर ग्रामपंचायत Live : संगमनेर तालुक्यात थोरात गटाचं पारडं जड ; २७ ग्रामपंचायतीवर वर्चस्व

Gram Panchayat Election 2022 : कन्नड तालुक्यात भाजपसह शिंदे गटाची जोरदार मुसंडी

 

 

 

Back to top button