‘सिनेमॅटिक लिबर्टी’च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध : संभाजीराजे

संभाजीराजे
संभाजीराजे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अनेक दिवसांपासून वादात असलेला 'हर हर महादेव' हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित होत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. ते म्‍हणाले की, माझा विरोध निर्मात्‍याला किंवा चित्रपटाच्या दिग्‍दर्शकाला नाही. माझा फक्‍त 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध आहे. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला आहे. हाच चुकीचा इतिहास आपण नव्या पिढीसमोर ठेवणार आहोत का? असा प्रश्नही त्‍यांनी विचारला. ऐतिहासिक चित्रपटांसाठी इतिहासकारांची समिती नेमावी, असं आवाहन त्‍यांनी राज्‍य सरकारला केलं. आपण यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्‍याचे त्‍यांनी  या वेळी स्‍पष्‍ट केले.

यावेळी संभाजीराजे म्‍हणाले," 'हर हर महादेव' चित्रपटाबाबत पाच ते सहा मुद्दे आहेत जे चुकीचे आहेत. ऐतिहासिक चित्रपटात सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवणे चुकीचे आहे. आपला जाज्‍वल्‍य इतिहास आपण असा चुकीच्या पध्दतीने नव्या पिढीसमोर ठेवणार आहोत का?. चित्रपटाचं पहिला स्‍क्रीनिंग महाराष्‍ट्रात व्हायला हवं. या चित्रपटात चुकीच्या द्‍श्‍याला आपला विरोध राहील. इतिहास चुकीचा दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, अशी भूमिका त्‍यांनी मांडली.

या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीका साकारली आहे. सुबेध भावेंनी सांगाव मी जी भूमिका केली आहे, ती रास्‍त आहे. जे पाच ते सहा मुद्दे दाखवलेत ते योग्‍य आहेत. मी चुकीची भूमिका घेत आहे, असं मला कोणीही सांगावं, त्‍यानंतर मी पुन्हा या चित्रपटावर कधीही भाष्‍य करणार नाही, असेही संभाजीराजे यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news