कोल्‍हापूर : हातकणंगले तालुक्यातील ३९ ग्रा.पं. निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार थेट शिवारात | पुढारी

कोल्‍हापूर : हातकणंगले तालुक्यातील ३९ ग्रा.पं. निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार थेट शिवारात

कासारवाडी (कोल्‍हापूर) : पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील ३९ गावांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांनी प्रचारासाठी मतदारांच्या भेटीगाठीवर जोर धरला आहे; पण कासारवाडी परिसरातील शिवारात ऊस तोडणी सुरू असल्याने बहुतांश मतदार शिवारात आहेत. गावात गाठीभेटी होईनात म्हणून उमेदवार थेट शिवारात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

तालुक्यातील अंबप, अंबपवाडी , कासारवाडी येथील निवडणुका चांगल्याच रंगात आल्या आहेत. अंबपमध्ये सत्ताधारी माने व विरोधी पाटील गटात ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघासारखी चुरस आहे. अंबपवाडी येथे जय शिवराय पॅनल आणि भैरवनाथ पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. कासारवाडी येथे लोकनियुक्त सरपंचपदासाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. शिवारात ऊस तोडणी असल्याने उमेदवार प्रत्यक्ष शिवारात जाऊन भेटीगाठी घेऊन प्रचार करत आहे.

हेही वाचा :

Back to top button