

4 automatic gates of Radhanagari Dam opened!
राधानगरी / पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्याला वरदायीनी ठरलेले,राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेले ८.३६ टी.एम.सी. क्षमतेचे राधानगरी धरण निम्म्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्यासह कृषी औद्योगिक विकासाचा केंद्रबिंदू असलेले राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
शुक्रवारी रात्री धरणाचे तीन दरवाजे खुले झाले. आज पहाटे 4.30 वा. धरणाचा चार नंबराचा दरवाजा खुला झाला असून या चार दरवाजातून 5712 तर विजगृहातून 1500 क्यूसेक्स असा एकूण 7212 क्यूसेक्स विसर्ग भोगावती नदीपत्रात होत आहे. नदिकाठाच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्याकडे कोल्हापूर व इचलकरंजीसह निम्म्या जिल्ह्याचे लक्ष असते. गेली अनेक वर्षे हे धरण जुलैच्या शेवटच्या अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरते.