कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार; शहरात जोरदार चर्चा! - पुढारी

कोल्हापूर : प्रेमप्रकरणातून तरुणीवर गोळीबार; शहरात जोरदार चर्चा!

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कळंबा तलाव परिसरात शुक्रवारी पहाटे एका युवकाने प्रेमप्रकरणतून एका युवतीवर गोळीबार केला. छराच्या बंदुकीतून बंदुकीतून हल्ला केल्याची चर्चा कळंबा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे गोळीबार केल्याची चर्चा गावांमध्ये सुरू झाले आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी संबंधित युवतीला त्वरित ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी कसून चौकशी करत आहेत तर गोळीबार करणाऱ्या त्या युवकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

त्याने राहत्या घरातून पलायन केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. गोळीबार झाला की नाही? या बाबत पोलीस तपस करत आहेत. मात्र छऱ्याच्या बंदुकीतून हल्ला केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

दरम्‍यान कळंबा येथे गोळीबार झाल्‍याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेने खळबळ उडाली. शहराजळील कळंबा तलाव परिसरात शुक्रवारी सकाळी एक युवती तिच्या आईसोबत गेली होती. त्यावेळी युवकाने प्रेमप्रकरणातून संबधित तरुणीवर गोळीबार केला. छऱ्याच्या बंदुकीतून हा गोळीबार झाल्याची चर्चा होती. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर नागरिक जमा झाले. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.

हे ही  वाचलं का?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button