Shivaji University : शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणुकीत विकास आघाडीचे बहुमत | पुढारी

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणुकीत विकास आघाडीचे बहुमत

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठ ( Shivaji University) अधिकार मंडळ निवडणुकीत विकास आघाडीने बहुमत मिळवले आहे. आघाडीचे प्रमुख संजय डी पाटील, भैय्या माने, अमित कुलकर्णी, डॉ.डी आर मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

शिवाजी विद्यापीठ विविध अधिकार मंडळांसाठी सोमवारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील 33 मतदान केंद्रांवर उत्साहात मतदान झाले. 100 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. अधिसभा शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, नोंदणीकृत पदवीधर, अभ्यास मंडळासाठी चुरशीने मतदान झाले. यंदा पदवीधरसाठी तीनपट जास्त नोंदणी होऊनही केवळ 30 टक्केच मतदान झाले. यंदा सरासरी 40 टक्के मतदान झाल्याचे समजते. बुधवारी (दि.16) सकाळी 8 वाजता विद्यापीठातील परीक्षा भवन येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला.

 Shivaji University : विकास आघाडीने बहुमत मिळवले

या निकालात शिवाजी विद्यापीठ अधिकार मंडळ निवडणुकीत विकास आघाडीने बहुमत मिळवले आहे. आघाडीचे प्रमुख संजय डी पाटील, भैय्या माने, अमित कुलकर्णी, डॉ. डी आर मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुलालाची उधळण करत जल्लोष केला. दरम्यान, रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत विद्या परिषदेवर सुटाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत‌. सध्या पदवीधर व महाविद्यालयीन शिक्षक गटाचे मतमोजणी सुरू आहे. पदवीधर गटात विकास आघाडीचे सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. आधिसभा महाविद्यालय शिक्षक गटात आघाडीचे प्रा. रघुनाथ ढमकले व डॉ. प्रशांत खरात विजयी झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button