Kolhapur : कोल्हापुरात गायरान अतिक्रमणप्रश्नी सर्वपक्षीय महामोर्चा (व्हिडीओ) | पुढारी

Kolhapur : कोल्हापुरात गायरान अतिक्रमणप्रश्नी सर्वपक्षीय महामोर्चा (व्हिडीओ)

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गायरानमधील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी आज कोल्हापुरात सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला. अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी आज (दि. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी केले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

गायरानमधील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला दिल्यामुळे राज्य शासनाने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढण्याची जोरदार तयारी सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिक बेघर होणार आहत. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर करावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. दसरा चौकातून सुरुवात झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर सर्व पक्षांच्या प्रमुखांची येथे भाषणे होणार आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button