कोल्हापूर अर्बन बँकेची आज मतमोजणी; दुपारपर्यंत निकाल | पुढारी

कोल्हापूर अर्बन बँकेची आज मतमोजणी; दुपारपर्यंत निकाल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : येथील कोल्हापूर अर्बन बँकेची मंगळवारी (दि. 15) रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात 40 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे.

बँकेच्या 15 जागांसाठी रविवारी (दि.13) मतदान झाले. निवडणूक रिंगणात 35 उमेदवार आहेत. 28 हजार मतदारांपैकी 13 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 48 टक्केच मतदान झाले आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतपत्रिका एकत्रीकरण झाल्यानंतर सर्व गटातील मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यालय अधीक्षक उदय उलपे हे काम पहात आहेत.

Back to top button