कोल्हापूर : वाकरेनजीक अपघातात बांदेवाडीची महिला ठार | पुढारी

कोल्हापूर : वाकरेनजीक अपघातात बांदेवाडीची महिला ठार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर वाकरे (ता. करवीर) फाट्याजवळ अज्ञात वाहनाला मोपेड धडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. वैशाली महादेव मोरे (वय 34, रा. तिसंगी पैकी बालेवाडी, ता. गगनबावडा) असे तिचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. वैशाली मोरे या अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम करत होत्या.

कामानिमित्त त्या कोल्हापूरला आल्या होत्या. काम आटोपून गावाकडे जाताना वाकरे फाटा येथे अज्ञात वाहनाला त्यांच्या मोपेडची धडक बसली. यामध्ये त्या रस्त्यावर आपटल्या. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी अ‍ॅम्ब्युलन्समधून त्यांना सीपीआरला पाठवले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Back to top button