कोल्‍हापूर : जठारवाडीतील जखमी महिला वारकऱ्याचा मृत्यू | पुढारी

कोल्‍हापूर : जठारवाडीतील जखमी महिला वारकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा जुनोनी (ता. सांगोला) गावाजवळ पंढरपूरला जाणा-या दिंडीमध्ये भरधाव कार घुसल्‍याने मोठा अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी सौ सरिता अरुण शियेकर (वय 45) रा. जठारवाडी, ता करवीर यांचा पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात (शनिवार) रात्री उशिरा मृत्यू झाला.

आज (रविवार) सकाळी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात आणण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदंगाच्या जयघोषात अंत्ययात्रा काढून शोकाकुल वातावरणात त्‍यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरिता शियेकर यांच्या मृत्यूमुळे या अपघातातील ठार झालेल्यांची संख्या आता 8 झाली आहे. या घटनेतील 6 जण जठारवाडी येथील होते.

दरम्यान, जठारवाडी येथील जखमी सुभाष काटे व अनिता जगदाळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अनिता जाधव यांच्यावर कोल्हापूर येथे तर शानुताई शियेकर यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :  

Back to top button