कोल्हापूर : हुपरीत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार; अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी केले दै. पुढारीचे वितरण | पुढारी

कोल्हापूर : हुपरीत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार; अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी केले दै. पुढारीचे वितरण

हुपरी; पुढारी वृतसेवा : हुपरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दैनिक पुढारी आयोजित ‘वाचक प्रेरणा दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी दै. पुढारीच्या अंकांचे वितरण केले.

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. कलाम यांचे विचार सर्वत्र जावेत, त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांना मिळावी यासाठी दैनिक पुढारीच्या वतीनेही आज सर्वत्र ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. हुपरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी वृतपत्र विक्रेते राजेंद्र शिंदे, रवींद्र शिंदे, बंडू मिरजकर, रोहण शिंदे, अरविंद शिंदे, वामन कुलकर्णी, सुरेश पलसे, मनिषा शिंदे, अनिता शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराने वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबिय भारावून गेले.

या कार्यक्रमाचे जनता शिक्षण समुहाचे अध्यक्ष अण्णासाहेब शेंडूरे, मुख्याध्यापक डी. ए. पाटील, दिपक तोडकर यांनी नियोजन केले होते. प्रारंभी पाटील व तोडकर यांनी कलाम यांचा जीवन प्रवास सांगितला. त्यानंतर दैनिक पुढारीच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेल्या विकासपर्वाची माहिती दिली. जनसामान्यांत रुजलेल्या दै. पुढारीचा हा उपक्रम प्रेरणा देणारा आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी ऊर्जा देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनाही पुढारीचा अंक विद्यार्थ्यांनी दिला. गिरी यांनी पुढारीच्या उपक्रमाचे कौतुक करुन पुढारीच्या माध्यमातून राज्यात विकासकामे होत आहेत, दैनिकाचा एक मोठा वाचक वर्ग निर्माण झाला आहे, असे सांगितले.

हेही वाचा :

Back to top button