नवरात्रीच्या सप्तमी तिथीला श्री अंबाबाईची शाकंभरीच्या रूपात पूजा | पुढारी

नवरात्रीच्या सप्तमी तिथीला श्री अंबाबाईची शाकंभरीच्या रूपात पूजा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : नवरात्रीच्या सप्तमी तिथीला आज (दि. २) अश्विन शुद्ध करवीर निवासिनी श्री अंबाबाईची बदामी निवासिनी शाकंभरीच्या रूपात पूजा बांधण्‍यात आली.  बादामीची बनशंकरी ही अनेकांची कुलदेवता. ज्या वेळेला अनेक वर्षांचा मोठा दुष्काळ पडला. तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी जगदंबेची प्रार्थना केली. त्यावेळेस जगदंबेने प्रगट होऊन स्वतःच्या शरीरातून शाक भाज्या निर्माण करून जगाचे पोषण केले म्हणून तिला शाकंभरी असे नाव मिळाले.

शाकंभरीलाच बनशंकरी म्हणजे वनामध्ये राहणारी देवी असेही म्हटले जाते. प्रतिवर्षी पौष महिन्यात अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरीचे नवरात्र संपन्न केले जाते. शाकंभरी सिंहावरती विराजमान होऊन आठ हातामध्ये विविध आयुध धारण करते. करवीर निवासिनी अंबाबाईची आजची शाकंभरी रूपातली अलंकार पूजा गजानन मुनीश्वर, मुकुंद मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी साकारली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button